top of page
Miracles Academy.webp

मिरॅकल्स अकॅडमी
ऑफ आर्टस् अँड मिडिया प्रा.लि.

मिरॅकल्स अकॅडमीची स्थापना 2002 साली करण्यात आली. शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही, दिसण्याची अट नाही, अनुभवाची अट नाही अशी ब्रीदवाक्ये असलेली मिरॅकल्स अकॅडमी मिडिया, आर्ट, टेक्निकल आणि सामान्य माणसाला नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकते असे कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रात राबवते.

अधिक माहितीसाठी
Facebook.webp
Twitter.webp
Instagram.webp
Email.webp
Youtube.webp
Website.jpg
Whatsapp.webp
Shetkari Maza.jpg

शेतकरी माझा

सामािजक दृिष्टकोन ठेवून महाराष्ट्रातील सर्व सेंद्रिय शेतकऱ्यांना धुंडाळून तसेच रासायिनक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून त्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करून त्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल आणि त्याच्याशी निगडित इतर उत्पादनांची विक्री योग्य दरात फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर संपूर्ण जगभरात करण्याचे, तसेच फ़क्त विक्रीपुरते मर्यादित नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे, त्यांच्या समस्या, प्रश्न मार्गी लावण्याचे, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे आणि फक्त शेतकऱ्यालाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय उराशी बाळगणारी संस्था म्हणजे "शेतकरी माझा" संस्था होय.

अधिक माहितीसाठी
Facebook.webp
Twitter.webp
Instagram.webp
Email.webp
Youtube.webp
Whatsapp.webp
Maharashtra Maza.jpg

महाराष्ट्र माझा

सध्याच्या भ्रष्ट आणि असंवेदनशील राज्यकर्त्यांच्या मगरमिठीतून महाराष्ट्रातील जनतेला संत आणि शिवाजी महाराजांच्या विचारांच्या मुशीतून तयार झालेले आणि तरीही आजच्या आधुनिक जगात वावरताना सुखी / समृद्ध महाराष्ट्राची कास धरून शिक्षण/रोजगार/शेती/ उद्योग/पर्यावरण/पिण्याचे पाणी/स्वच्छता/अध्यात्म आणि हिंदू संस्कृती या सर्व विषयातील ऋषितुल्य तज्ञ यांना एकत्र आणून या सर्वांना निवडणुकीला उभे करून सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘महाराष्ट्र माझा’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

अधिक माहितीसाठी
Facebook.webp
Instagram.webp
Email.webp
Youtube.webp
Whatsapp.webp

आमच्याविषयी

 
 

संचालक

प्रमोद प्रभुलकर

(लेखक, दिग्दर्शक)

प्रसिद्ध लेखक/ दिग्दर्शक ‘मिरॅकल्स अकॅडमीचे’ संचालक आणि सध्याच्या भ्रष्ट आणि असंवेदनशील राज्यकर्त्यांच्या मगरमिठीतून महाराष्ट्रातील जनतेला संत आणि शिवाजी महाराजांच्या विचारांच्या मुशीतून तयार झालेले आणि तरीही आजच्या आधुनिक जगात वावरताना सुखी / समृद्ध महाराष्ट्राची कास धरून शिक्षण/रोजगार/शेती/ उद्योग/पर्यावरण/पिण्याचे पाणी/स्वच्छता/अध्यात्म आणि हिंदू संस्कृती या सर्व विषयातील ऋषितुल्य तज्ञ यांना एकत्र आणून या सर्वांना निवडणुकीला उभे करून सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘महाराष्ट्र माझा’ पक्षाचे संस्थापक आणि ‘शेतकरी माझा’ या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणाऱ्या उद्योग चळवळीचे कर्ता-धर्ता ‘प्रमोद प्रभुलकर’ हे अतिशय दूरदृष्टी असलेले, क्रांतिकारी विचारांचे, उत्साही, मनमिळाऊ, हसमुख व्यक्तिमत्व आहे.
               याशिवाय दहावीला ९०.१४ % मिळवून महाराष्ट्रात १७ वे आलेले ‘प्रमोद प्रभुलकर’ हे अभ्यासात हुशार असूनही त्यांचा कल चित्रपटसृष्टीकडे होता. त्यांच्या या सिनेसृष्टीच्या ओढीमुळे त्यांनी गोड गुपित (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू ), ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे (मुख्य भूमिका - भरत जाधव), सुंदर माझं घर (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, मधुराणी प्रभुलकर, राहुल मेहेंदळे), फिनिक्स (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर), युथट्यूब (मुख्य भूमिका - शिवानी बावकर) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले.
                या चित्रपटांमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रमुख आणि सहाय्यक भूमिकांमध्ये रोल्स दिले. शिवानी बावकर (लागीरं झालं जी), ऋता दुर्गुळे (दुर्वा / फुलपाखरू), गिरीजा प्रभू (सुखं म्हणजे नक्की काय असतं...!), किरण गायकवाड (लागीरं झालं जी/ देवमाणूस), निखील चव्हाण (लागीरं झालं जी), स्वरदा ठिगळे (ताराराणी), आकाश शिंदे (सहकुटुंब सहपरिवार) यांच्यासारखे मिरॅकल्स अकॅडमीचे असंख्य विद्यार्थी आज अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
                     ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी मिरॅकल्स अकॅडमीची स्थापना 2002 साली केली. शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही, दिसण्याची अट नाही, अनुभवाची अट नाही अशी ब्रीदवाक्ये असलेली मिरॅकल्स अकॅडमी मिडिया, आर्ट, टेक्निकल आणि सामान्य माणसाला नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकते असे कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रात राबवते.

 

Pramod Sir.webp
अधिक माहितीसाठी
Facebook.webp
Instagram.webp
Youtube.webp

CONTACT

Thanks for submitting!

bottom of page